Saved Bookmarks
| 1. |
निसर्ग माझा मित्र, सोबती, गुरु, निर्सगाचे महत्व मराठी निबंध... |
|
Answer» "हिरवे हिरवे गार गालिचे.." ही कविता तुम्ही तुमच्या लहानपणी ऐकली असेलच. हो बरोबर ह्या कवितेतील ओळी आपल्याला निसर्गाबद्दल बरच काही सांगून जातात. ह्या जगात निसर्गाला खूप मोठे स्थान दिले आहे. आपण जी श्वास घेतो ती हवा, पीतो ते पाणी आणि खातो ते अन्न सगळ निसर्गाची देण आहे. निसर्गाचे संरक्षण करणे, त्याला हानी न पोहचवणे हे सगळं आपल्या हातात आहे कारण आपल्या रोजच्या कामांमध्ये निसर्गाचा मोठा संबंध आहे. उंच उंच डोंगर, वाहणाऱ्या नद्या, मोठे झाड, कीलबिलणारे पक्षी, सुंदर प्राणी ह्या सगळ्या गोष्टींवर सुद्धा निसर्गाचा प्रभाव असतो. असा हा निसर्ग मला खूप प्रिय आहे आणि त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. |
|