InterviewSolution
| 1. |
नवरात्र माहिती, निबंध, भाषण मराठीमध्ये |
|
Answer» नवरात्री हा भारतामधील एक प्रमुख सण आहे.हा सण अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी पर्यंत साजरा करतात.नवरात्रीत दुर्गा देवीच्या नऊ रूपांची आराधना केली जाते. नवरात्रीत देवीची मूर्ती सजवली जाते.तिला हळद कुंकु वाहून तिची ओटी भरली जाते. प्रतिपदेला घट स्थापित केले जाते.मडक्यामध्ये काळी माती टाकून त्यामध्ये ५ वेगळ्या प्रकारचे धान्य पेरले जाते.रोज नऊ दिवसांसाठी देवीची आरती केली जाते,रोज एक फूलांची माळा बांधली जाते. काही लोक नऊ दिवस उपवास ठेवतात.शास्त्राप्रमाणे नवरात्रीमधील प्रत्येक दिवस एक रंग आणि नैवेद्य ठरलेला असतो. सार्वजनिक मंडळात नवरात्री जल्लोषाने साजरा करतात.देवीच्या मूर्तीसामोर संध्याकाळी गरबा व दांडिया खेळतात.नवरात्रीत कन्या पूजा केले जाते.घरी लहान मुलींना बोलवून,त्यांची पूजा करतात,त्यांचे पाय धुवतात व त्यांची ओटी भारतात. दशमीला देवीचे विसर्जन केले जाते. अशा प्रकारे,भारताच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे नऊ दिवस हा सण आनंदाने साजरा केला जातो. Explanation: |
|