1.

Prachin bharatacha nepolian konala mntle jate

Answer»

गुप्त साम्राज्याचा प्रभावी सम्राट व भारताच्या इतिहासातील महान सेनानी होता. इतिहासकार यांना भारताचा नेपोलियन मानतात.समुद्रगुप्त हे नाव त्याने पार पाडलेल्या लष्करी मोहिंमामुळे पडले होते व त्याने गुप्त साम्राज्याच्या सीमा तत्कालीन भारताच्या सागरापर्यंत नेउन गेला होता. समुद्रगुप्तला अनेक जेष्ठ बंधू असले तरी समुद्रगुप्तची सम्राट बनण्याची पात्रता इतरांपेक्षा जास्त होती म्हणून चंद्रगुप्त पहिल्यानंतर समुद्रगुप्त सम्राट बनला.

समुद्रगुप्त बद्दल माहिती अलाहाबाद मधील शिलास्तंभांवरुन मिळते जे त्याच्या कार्यकालात उभारले होते. त्यात समुद्रगुप्तच्या विविध मोहिंमांचा दाखला आहे. हे शिलालेख तत्कालीन भारताची राजकिय स्थिती दर्शावतात, कारण विविध राजा, राज्ये व त्यात सहवास करणाऱ्या लोकांचा त्यात उल्लेख आहे.



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions