InterviewSolution
| 1. |
राष्ट्रीय एकात्मता काळाची गरज मराठी निबंध, भाषण, लेख, माहिती |
|
Answer» ANSWER: राष्ट्रीय एकात्मता ही एक भावना आहे आणि ही भावना एखाद्या राष्ट्रातील किंवा देशातील लोकांमध्ये देशाबद्दलचे बंधुत्व किंवा आपुलकी दर्शवते. राष्ट्रीय एकात्मता देशाला मजबूत आणि संघटित करते. राष्ट्रीय एकात्मता ही ती भावना आहे जी विविध धर्म, पंथ, जाती, पोशाख, सभ्यता आणि संस्कृतीच्या लोकांना एकाच धाग्यात एकत्र बांधून ठेवते. त्यामुळे बरीचशी विविधता असूनही सर्व लोक भारतात एकत्र राहतात. अजूनही देशात जातपात, धर्म, पंथ यांच्या आधारावर भारतीय जनतेमध्ये भेदभाव केला जातो. धर्माच्या नावाखाली काही समाजकंटक एकमेकांबद्दल द्वेषभावना पसरवत आहेत. देशाचे अखंडत्व आणि ऐक्य मोडून काढण्यासाठी काही समाजविघातक शक्ती कार्यरत आहेत. म्हणून जर देशातील शांतता आणि एकता अबाधित ठेवण्यासाठी आजच्या काळात राष्ट्रीय एकात्मता फार आवश्यक आहे. Explanation: |
|