InterviewSolution
| 1. |
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज – मराठी माहिती, निबंध, भाषण... |
|
Answer» ANSWER: तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. राष्ट्रपतिभवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिले होते. तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील (१९०९-१९६८) संत होते. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते अध्यात्मिक सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचं प्रबोधन करीत होते. एवढंच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. विश्वाच्या गोष्टी करत बसण्यापेक्षा आपल्या देशाच्या अन् विशेषत: आपल्या गावाच्या गोष्टी करण्याचा ध्यास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी घेतला. ग्रामोद्धार, ग्रामविकास, स्वावलंबी ग्रामनिर्मिती हे त्यांच्या जीवनाचे अविभाज्य भाग बनले. भजन आणि कीर्तनाचा प्रभावी वापर त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन आणि जातिभेद निवारणासाठी केला. खंजिरी भजनाद्वारे प्रबोधन यात त्यांचा हातखंडा होता. आपले विचार त्यांनी 'ग्रामगीता' या काव्यातून मांडले. मराठीसोबतच त्यांनी हिंदीतूनही काव्यरचना केली. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता आणि तुरुंगवासदेखील भोगला होता. महाराजांचे महानिर्वाण ३१ ऑक्टोबर, १९६८ रोजी झाले. Explanation: |
|