1.

शाळेचा शताब्दी वर्ष सांगता समारंभ माननीय शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न याची बातमी

Answer»

द्यालयाने शताब्दी वर्षा गाठले, शिक्षण मंत्रीनी दिल्या शुभेच्छा.नाशिक,१६ मार्च २०१९: नाशिक मधील समता विद्यालय हे सर्वात जुने विद्यालय असून ह्या वर्षी त्याला १०० वर्ष पूर्ण झाले आहेत. हा त्यांचा शताब्दी वर्ष असल्यामुळे शाळेने एक भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी मा. शिक्षण मंत्री श्री विनोद तावडे याना आमंत्रित करण्यात आले होते.शताब्दी वर्ष साजरा करण्याचा कार्यक्रम ३ दिवस चालला. विविध स्पर्धा आणि खेळ खेळण्यात आले होते. शाळेत शिकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आमंत्रण दिले असून सर्व दिवशी शाळेत भरपूर विद्यार्थांनी हजेरी लावली. शेवटच्या दिवशी बक्षीस वितरण सोहळा व सांगता होती. मा. शिक्षण मंत्री यांनी मुलांना मार्गदर्शन दिले आहे कार्यक्रमाची सांगता केली. समता विद्यालयातील हा सोहळा अगदी आनंदाने पार पडला.



Discussion

No Comment Found