1.

शिक्षकांनी वि्यार्थ्यांना वरील मुद्द्यावरून कथा लिहायला सांगावी. कथाबिज, कथेची सुरुवात, कथेतील घटना, स्थळ, कथेतील पात्र व त्यांचे स्वभाव, कथेची भाषा, काळ, कथेचा शेवट, शिकवण ई.​

Answer» <html><body><p><strong><a href="https://interviewquestions.tuteehub.com/tag/answer-15557" style="font-weight:bold;" target="_blank" title="Click to know more about ANSWER">ANSWER</a>:</strong></p><p>कथेची वैशिष्ट्ये</p><p></p><p>    मराठी भाषेचे कथादालन खूप समृद्ध आहे. ते विविधतेने आणि गुणवत्तेने नटलेले आहे. त्यामुळेच मराठी कथा अनेकविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण झाली आहे.</p><p></p><p>(१) कथा मनोरंजन करते. </p><p></p><p>         मराठी कथा विलक्षण मनोरंजक आहे. तिची खुमारीच मोठी न्यारी आहे. मराठीत सर्वांत जास्त वाचला जाणारा साहित्यप्रकार म्हणजे ‘कथा’ होय. दिवाळी अंकांमध्ये कथेला मानाचे पान दिले जाते, ते तिच्या मनोरंजकता या वैशिष्ट्यामुळे. आबालवृद्ध कथा सांगण्याचा आणि ऐकण्याचा आनंद मनमुराद लुटतात तो तिच्या या मनोरंजकतेमुळेच. मनोरंजनाची कितीतरी अत्याधुनिक साधने-उदा., टी. व्ही. वगैरे खूप नंतर उदयास आली; पण पहिला मान कथेचाच. कथा सर्वांनाच हवीहवीशी वाटते याचे कारण तिच्या मनोरंजकतेत दडले आहे. मुले तर गोष्ट सांगण्यासाठी भंडावून सोडतात. मोठी माणसेही याला अपवाद नसतात. माणूस गोष्टीवेल्हाळ झाला तो तिच्या ‘मनोरंजकता’ या वैशिष्ट्यामुळेच.</p><p></p><p>(२) कथेमुळे सुसंस्कार होतात.</p><p></p><p>                 मनोरंजकते प्रमाणेच मनावर संस्कार करण्याचीही जबरदस्त ताकद कथेत असते. कथेच्या माध्यमातून ‘मूल्यविचार’ रुजवता येतात. कथा प्रेरणा, स्फूर्ती, बोध, ज्ञान देते. मानवता, सत्य, समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुभाव, औदार्य, धैर्य, श्रमनिष्ठा, संवेदनशीलता, दया, सहकार्य अशा कितीतरी मूल्यांचा संस्कार कथा करते. मानवी मूल्यांची कदर करणारी आदर्श व्यक्तिमत्त्वे कथावाङ्मयात जागोजागी आढळतात. सामान्य माणूस प्रसंगी आभाळाएवढा मोठा कसा होऊ शकतो हे एखाद्या बोधकथेच्या माध्यमातून वाचकांच्या मनावर ठसवता येते. या संस्कारक्षमतेच्या वैशिष्ट्यामुळेच तर कथेतून सद्गुणांचे पाथेय देता येते.</p><p></p><p>(३) कथा वाचकांची उत्कंठा वाढवते.</p><p></p><p>कथा वाचताना अनेकदा ‘आता पुढे काय होणार’ अशी उत्सुकता वाचकाच्या मनात निर्माण होते. त्याच्या मनात जिज्ञासा जागी होते. कारण कथानक वाचकाला खिळवून ठेवणारे असते. कथेतील पात्रे आणि प्रसंग यांची गुंफण अशा कौशल्याने केलेली असते, की वाचक त्यात तल्लीन होऊन जातो. वाचकाला वर्तमानातून भूतकाळात घेऊन जाणे आणि पुन्हा वर्तमानात आणणे अशा फ्लॅशबॅक लेखनशैलीमुळे कथा उत्कंठावर्धक होते. यादृष्टीने पाठ्यपुस्तकातील ‘शोध’ ही कथा एकदा वाचा. त्या कथेतील आकस्मिक वळणे, नाट्यमय प्रसंग, कथेचा अनपेक्षित शेवट या सर्वांमुळे उत्कंठा शेवटपर्यंत कशी टिकून राहाते, हे तुमच्या लक्षात येईल.</p><p></p><p>(४) कथा एककेंद्री असते.</p><p></p><p>    अनुभवाचे, रचनेचे एककेंद्रित्व हे कथेचे वैशिष्ट्य आहे. कादंबरी वा नाटकाप्रमाणे ती बहुकेंद्री नसते. कथेतील प्रसंग, पात्रे, वातावरण मर्यादित असते म्हणूनच ती लहान असते, लघू असते. ती पसरट नसते. तिचे स्वरूप स्फुट (छोटे) असते. </p><p></p><p>(५) कथा भूतकाळात लिहिली जाते.</p><p></p><p>    सर्वसाधारणपणे कथा भूतकाळात लिहिली जाते.     कथेत होऊन गेलेल्या घटनांविषयीचे निवेदन असते. उदा., एक होते गाव. तिथे एक दानशूर माणूस राहायचा; ही अशी वाक्यरचना सर्वसाधारणपणे कथेत आढळते. कथेत एखादी हकीकत असते, घडून गेलेले प्रसंग असतात, त्यांचे वर्णन असते. त्यामुळे आपोआपच कथालेखनासाठी भूतकालीन निवेदनशैली वापरली जाते.</p><p></p><p>(६) कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो.</p><p></p><p>         कथा मानवी जीवनाचा थेटपणे वेध घेते. ती जीवनस्पर्शी असते. राजाराणी असो वा एखादा टॅक्सीड्रायव्हर, नर्स असो वा गावातला लोकसेवक; त्या प्रत्येकाच्या जीवनातील घटनांचा, भावभावनांचा, वैचारिक उलथापालथींचा धांडोळा घेण्याची ताकद कथेत असते. कथेला एकही जीवनविषय वर्ज्य नाही. बालपणी काऊचिऊच्या रूपाने मानवी जीवनात प्रवेश करणारी कथा आयुष्यात ठाण मांडून बसलेली असते. जीवनाचा वेध घेण्याचे हे वैशिष्ट्य कथेची खासियत आहे.</p><p></p><p>(७) श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते.</p><p></p><p>        सादरीकरण म्हणजे सादर केले जाणे, सांगणे, कथन करणे. कथा सादर केली जाते. कथामाला, बालकमेळावे, बालसाहित्य संमेलने इथे आवर्जून कथा सांगितल्या जातात. नाटके, कादंबऱ्या, निबंध वा लेखसंग्रह यांचे कथन फारसे होत नाही;पण कथाकथन मात्र घरोघरी, शाळाशाळांमध्ये, साहित्यविषयक कार्यक्रमांमध्ये नित्यनेमाने घडत असते. कथा सांगणाऱ्याने ती मनोभावे सांगणे आणि ऐकणाऱ्याने ती एकचित्ताने ऐकणे ही सांस्कृतिक देवघेव पूर्वी होत होती, आज होत आहे, उद्याही होत राहील.</p><p></p><p>कथेचे सादरीकरण</p><p></p><p>    कथेचे ‘सादरीकरण’ ही एक कला आहे आणि योग्य प्रयत्नाने ही कला साध्य होऊ शकते. विविध प्रकारच्या कथांचे मूकवाचन, प्रकट वाचन करण्याचा सराव, विविध कथा लेखकांची/लेखिकांची लेखनशैली समजून घ्यायचा केलेला प्रयत्न, भाषेची जाण, शब्दोच्चार आणि सादरीकरण कौशल्ये यांमुळे कथाकथनाचे तंत्र अवगत होऊ शकते.</p><p></p><p>     अलीकडच्या काळात ‘कथाकथन’ क्षेत्रात अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध होत आहेत. कथा-अभिवाचनाचे कार्यक्रम विविध निमित्ताने रंगमंचावरून सादर केले जात आहेत. आकाशवाणी, दूरदर्शन या लोकप्रिय माध्यमांतून सादर केले जाणारे ‘कथाकथन’ अधिकाधिक लोकांना आकर्षित करत आहे. या पार्श्वभूमीवर कथा-सादरीकरण हा पैलू लक्षणीय ठरतो.</p><p></p><p>अभिवाचन</p><p></p><p>अभिवाचनामुळे कथा श्रोत्यांपर्यंत योग्यप्रकारे पोहोचण्यास मदत हाेते. कथेचे अभिवाचन एकाच वेळी जर अनेकांकडून केले गेले तर आवाजाचा एकसुरीपणा टळतो. संवादातील चढउतार, चटपटीतपणा, शब्दफेक यांतील विविधतेचा आनंद श्रोत्यांना मिळतो. कथेतील घटना, प्रसंग, व्यक्तिरेखा यांचे आकलन होण्यास मदत होते. कथावाचनाला जर पार्श्वसंगीताची, प्रकाशयोजनेची, नेपथ्याची जोड दिली तर ते अभिवाचन श्रोत्यांवर चांगला परिणाम करते व दीर्घकाळ स्मरणात राहते. </p><p></p><p>कथाकथन</p><p></p><p>        कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला भाषेच्या ज्ञानाबरोबरच वाचिक अभिनयाचीही थोडी जोड द्यावी लागते, त्यामुळे कथाकथन उठावदार होते. कथाकथन करणाऱ्याला शब्दांच्या माध्यमांतून पात्रांना जिवंत करायचे असते. कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला कथा सादर करायची असल्याने कोणताही लिखित मजकूर हातात नसतो. श्रोत्यांशी संवाद साधत, त्यांचा प्रतिसाद घेत, लेखकाच्या मूळ संहितेला धक्का न लावता; पण परिणामकारकरीत्या ती श्रोत्यांपर्यंत पोहोचवायची असते. </p></body></html>


Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions