1.

शहिद सैनिकांच्या पत्नीचे मनोगत, आत्मवृत्त, मराठी निबंध, भाषण, लेख

Answer»

ANSWER: नमस्कार, मी एका शहीद सैनिकाची पत्नी बोलत आहे. माझे पती या भारतमातेच्या रक्षणासाठी शहीद झाले आहेत. पती गमावल्याचे दु:ख तर आहेच परंतु त्यांनी देशासाठी प्राण दिले याचा जास्त अभिमान आहे.

आम्हांला दोन गोड मुले आहेत. आता मला एकटीलाच मुलांचा आणि पतीच्या आईवडिलांचा सांभाळ करावा लागणार आहे. एक वीरपत्नी म्हणून मी ही जबाबदारी शिताफीने पार पाडेनच. मलासुद्धा माझ्या पतीप्रमाणे सैन्यात दाखल होऊन त्यांची देशरक्षणाची जबाबदारी पार पाडायची आहे. माझ्या मुलांनादेखील मी सैन्यात भरती करणार आहे.

माझ्या या प्रयत्नांसाठी मला तुमच्या शुभेच्छांंची गरज आहे. जय हिंद!

EXPLANATION:



Discussion

No Comment Found