InterviewSolution
| 1. |
सहलीसाठी परवानगी घेण्याविषयी आई आणि मुलीमधील संवादाचे लेखन करा. |
|
Answer» राजश्री महाविद्यालयाची यंदाची सहल शिमला - कुल्लू - मानली ला जाणार ही खबर मुलांच्या कानावर येताच सगळे खूप आनंदित झाले, पण प्रश्न राहिला तो मात्र पालकांकडून परवानगी घ्यायचा. हा एक संवाद शीला व तिच्या आई सोबत शीला: आई मी घरी आले!! खायला काय बनवला आहे ? आई: वा! आज स्वारी खुश दिसत आहे. शीला: हो आज गोष्टच तशी आहे! आई: काय तरी हवं आहे असं वाटतं आहे! शीला: एक विचारू ? आई: हो विचार ना ! शीला: कॉलेजमधून आमची पुडच्या महिन्यात शिमला - मानली ला सहल जाणार आहे. त्याची परवानगी मागायची होती. आई: गोष्ट आहे मस्त! पण आपण फिरलो आहोत की आधी इकडे! शीला: हो पण मित्र मैत्रिणी बरोबर जायची वेगळीच मजा असते. आई: किती पैसे भरायचे आहेत उद्या ? शीला: उद्या फक्त १०००रुपये द्यायचे आहेत आई: ठीक आहे जा तू, बाबांना विचार एकदा तरी! शीला: आई तू खूप चांगली आहेस, थँक्यू!!! |
|