| 1. |
संत ज्ञानेश्वर निबंध लिहा |
Answer» ⠀⠀⠀⠀⠀⠀संत ज्ञानेश्वरसंत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राचे महान वैभव, मराठी साहित्यातील महान तत्त्वज्ञ कवी. त्यांचा जन्म इ. स. १२७५ मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी होते. संत निवृत्तिनाथ हे त्यांचे वडील बंधू, संत सोपानदेव व संत मुक्ताबाई ही त्यांची लहान भावंडे, या चारही भावंडांचा समाजाने अतोनात छळ केला. समाजाने ज्ञानदेवांना छळले. पण ज्ञानदेवांनी सदैव समाजाच्या हिताचाच विचार केला. संस्कृतमधील 'भगवद्गीता' या महान ग्रंथाचा भावार्थ त्यांनी मराठीत समजावून सांगितला. यालाच 'भावार्थदीपिका' किंवा 'ज्ञानेश्वरी' म्हणतात. संत ज्ञानेश्वरांनी लोकांना परमेश्वरभक्तीचा अत्यंत सोपा मार्ग दाखवला. साधे नामस्मरण हासुद्धा भक्तीचा मार्ग आहे, हे त्यांनी दाखवून दिले. त्यासाठी त्यांनी 'वारकरी पंथा'ची स्थापना केली. समाजातील सर्व स्तरांतल्या लोकांना त्यांनी वारकरी पंथात आणले. 'अमृतानुभव', 'चांगदेव पासष्टी' व 'हरिपाठाचे अभंग' या ग्रंथांचीही संत ज्ञानेश्वरांनी रचना केली. त्यांनी इ. स. १२९६ मध्ये आळंदी येथे समाधी घेतली. |
|