1.

संवाद शिक्षक आणि विद्यार्थी मधील

Answer»

शिक्षक : अहो, हा मारतो वर्गातल्या मुलांना आणि शिक्षकांना उलट उत्तरं देतो.पालक : इथेही? घरी पण मारामारी करत असतो. त्याची चुलत बहीण दोन वर्षांनी मोठी आहे, पण हा तिलाही मारतो.शिक्षक : तेच ना... आता इतर पालकांच्या तक्रारीही यायला लागल्या आहेत.पालक : तुम्हाला सांगते, परवा तर याला असा राग आला की, कप आपटून फोडले याने टेबलावर ठेवलेले.शिक्षक : बाप रे, आत्तापासून इतका बेशिस्त वागायला लागला, तर काही खरं नाही पुढे.पालक : हो ना... आम्ही तर अगदी हात टेकलेत याच्यापुढे. तुम्हीच काय ते करा आता.शिक्षक : अहो, आम्ही कुठे कुठे लक्ष ठेवणार? अशी २५-३० मुलं सांभाळायची असतात वर्गात.पालक : ते आहे हो. पण शिस्त शाळेतच लागणार ना? वाटलं तर द्या दोन ठेऊन. घरी आमचं आजिबात ऐकत नाही हा.शिक्षक : हं... ही आजकालची पिढी म्हणजे ना अतिस्मार्ट आहे. पालक-शिक्षकांचं काही खरं नाही.पालक : अगदी बरोबर. आपल्या वेळी आपण पालक-शिक्षकांचं सगळं ऐकायचो. उलट बोलायची तर हिंमतच नव्हती.शिक्षक : हो ना. हाताबाहेर गेलीये ही पिढी...



Discussion

No Comment Found