1.

सुगरण पक्ष्याबद्दल माहिती​

Answer»

मराठी नाव : सुगरण, बाया, विणकर, गवळणहिंदी नाव : बाया, सोनचिडीसंस्कृत नाव : सुगृहकर्ता, सूचिमुख, पीतमुंड, कलविणइंग्रजी नाव : WEAVER Birdशास्त्रीय नाव : Ploceus philippinusसुगरण हा चिमणीच्या आकाराचा लहान पक्षी आहे. पिवळ्या धम्मक रंगातील हा पक्षी त्याच्या घरटी बांधण्याच्या कलेसाठी प्रसिद्ध आहे. गावाजवळ एखाद्या बाभळीच्या झाडावर सुगरण पक्ष्यांची अनेक सुबक घरटी लटकताना दिसतात. डॉ सलीम अली यांचा सुगरण पक्ष्याचा बराच अभ्यास होता.मादी आणि विणीच्या हंगामात नसलेला नर हे मादी चिमणी सारखेच दिसतात, मातकट-काळ्या रंगाचे. विणीच्या हंगामात नराचे डोके पिवळे, पाठीवर पिवळ्या-तपकिरी रेषा, छातीचा भाग पिवळा तर उर्वरित भाग फिकट पांढरा, सायीसारखा असतो.सुगरण भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार इ. देशांत आढळतो. हा पक्षी स्थानिक निवासी असला तरी काही उपजाती स्थलांतर करणाऱ्या आहेत. रंग आणि आकारावरून याच्या किमान तीन उपजाती आहेत. १. पट्टेरी सुगरण(STREAKED Weaver)(Ploceus manyar)(संस्कृतमध्ये कलविंक, कौलिक, चंचुसूचि); २. काळ्या छातीची सुगरण(Blackbreasted/throated Weaver)(Ploceus benghalenis), वगैरे. पण या सर्वांत बाया हा सर्वात जास्त आढळणारी उपजात आहे.



Discussion

No Comment Found