| 1. |
SWACH Pune essay in Marathi |
|
Answer» राज्यातील एक महत्त्वाचे असे शहर आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळा व मुठा ह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले असून येथे पुणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. नागरी सोयीसुविधा आणि विकासाबाबतीत पुणे हे संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईनंतर अग्रेसर आहे. या शहराच्या पुणं या नावाचे POONA हे इंग्रजी स्पेलिंग सुमारे १५० वर्षे प्रचलित होते. शहरात पूर्वापार चालत असलेल्या अनेक शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळ्खतात. छत्रपती श्रीशिवजीच्या आधीच्या काळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारतातील सातवे मोठे शहर असून महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे.[ संदर्भ हवा ]. समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले आहे. पुणे शहर ही महाराष्ट्राची 'सांस्कृतिक राजधानी' म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे शहरात असलेल्य नामांकित शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. पुणे शहर उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा अग्रेसर आहे. मराठी ही शहरातील मुख्य भाषा मानली आहे. पुण्यामध्ये ऐतिहासिकः- लाल महाल आहे , तुळशी बाग आहे, शनिवार वाडा आहे, विश्रामबाग वाडा आहे इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे सर्वांनी भेट द्यावीत अशी आहेत. ही सर्व ठिकाणे ऐतिहासिक व पर्यटन स्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत. पुणे शहर आणि परिसरात पाच नद्या आहेत. |
|