InterviewSolution
| 1. |
थोर समाजसुधारक बाबा आमटे – मराठी माहिती, निबंध, भाषण, लेख |
|
Answer» बाबा आमटे यांचे खरे नाव मुरलीधर देवीदास आमटे होते.त्यांचे घरातले त्यांना लाड़ाने बाबा बोलत असे.त्यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील हिंघणघाट मध्ये २६ डिसेंबर,१९१४ रोजी झाला.त्यांचा जन्म एका ब्राह्मिन कुटुंबात झाला होता. ते एक थोर समाजसेवक होते.पेशाने ते एक वकील होते.त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळ,लोक बिरादरी प्रकल्प,भारत जोड़ो आंदोलन,नर्मदा बचाओ आंदोलन अशा वेगवेळ्या चळवळींमध्ये जोमाने भाग घेतले. गोरगरीब व समाजातील मागासलेल्या लोकांसाठी ते आयुष्यभर झटले. कुष्ठरोग्यांची त्यांनी काळजी घेतली.त्यांच्यासाठी त्यांनी चंद्रपूर येथे 'आनंदवना'ची स्थापना केली.त्यांच्या कामगिरिसाठी त्यांना पद्मश्री,पद्मविभूषण,जमनालाल बजाज पुरस्कार असे विविध पुरस्कार मिळाले.दुर्दैवाने वयाच्या ९३ व्या वर्षी ९ फेब्रुवारी २००८ रोजी, आनंदवन येथे त्यांचा मृत्यु झाला. Explanation: |
|