InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
तुमच्या मित्राने लिहिलेला या अभयारण्याच्यानिबंधाला जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिकप्राप्त; त्याला अभिनंदन पत्र लिहा. |
|
Answer» Answer: २३२, गांधी नगर, मुंबई प्रिय मित्र रमेश सप्रेम नमस्कार, अभिनंदन ! आज सकाळी वर्तमान पत्रात आलेली तुझी बातमी की, तू जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांक पटकावला आहेस, हे वाचून मला खूप आनंद झाला. लागलीच तुला हे पत्र लिहीत आहे. शाळेत असतानाच तुझ्या विचारांनी मन भारावून जायचं. ज्या पद्धतीने तू एखाद्या विषयाला अनुसरून अगदी सोप्या आणि साध्या शब्दात लेख लिहायचा स सर्वांना च तुझा हेवा वाटायचा आज तुला प्रथम क्रामांकाच पारितोषिक मिळालं हे पाहून माझं आनंद गगनात मावेना सारखं झालंय. तुझ्याकडे असलेली लेखनाची कला अशीच जप . तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. कळावे, तुझाच मित्र अभिजित |
|