| 1. |
Write about the savitribai fule |
Answer» ⠀⠀⠀⠀ सावित्रीबाई फुलेसावित्रीबाई फुले या आधुनिक महाराष्ट्रातील पहिल्या बंडखोर स्त्री सुधारक होत. त्यांचा जन्म इ. स. १८३१ मध्ये झाला. प्रसिद्ध समाजसुधारक जोतीराव फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. जोतीरावांनी त्यांना शिक्षण दिले. सावित्रीबाईचे विचार बंडखोरीचे होते. म्हणून त्या जोतीरावांच्या कार्यात सहभागी झाल्या. सुरुवातीला सावित्रीबाईंनी हळदीकुंकू समारंभ आयोजित केले. त्या निमित्ताने त्यांनी सर्व जातींतील स्त्रियांना एकत्र आणायचा प्रयत्न केला. इ. स. १८४८ मध्ये भारतातील पहिली मुलींची शाळा जोतीरावांनी सुरू केली. त्या शाळेत त्या शिकवू लागल्या. त्या काळात स्त्रियांना शिक्षण देण्यास समाजाचा कडाडून विरोध होता. स्त्रियांना त्या शिकवतात, म्हणून लोकांनी त्यांच्यावर दगड, शेण फेकले. त्यांची निंदानालस्ती केली. तरीही त्या डगमगल्या नाहीत. सावित्रीबाई या लेखिका व कवयित्री होत्या. त्यांनी 'काव्यफुले', 'जोतीबांची भाषणे' वगैरे ग्रंथ लिहिले. जोतीरावांच्या मृत्यूनंतरही त्यांनी आपले कार्य धडाडीने चालूच ठेवले. इ. स. १८९६ मध्ये पुण्यात दुष्काळ पडला. त्या दुष्काळात व नंतर प्लेगच्या साथीत त्यांनी रुग्णसेवा केली. त्याच साथीत प्लेगची लागण होऊन इ. स. १८९७ मध्ये त्यांचे निधन झाले. |
|