1.

बागेतील झाडावर उमललेले एखादे टपोरे फुल असते. त्याचा सौम्यसा सुगंध आल्हाददायक असतो त्याच्या नाजूक पाकळ्या आणि सुरेख रंग डोळ्यांना सुखावतात. हा छोटासा अनुभव घेतानाही आपले मन प्रसन्न होऊन जाते.इवल्याशा फांदीवर वाऱ्याच्या लहरींनी डुलणारे ते फूल त्याच दिवशी संध्याकाळी कोमेजून जाते हे खरे; पण त्यामुळे त्याचे दिवसभरातील अस्तित्व आणि जाणाऱ्या-येणाऱ्याला त्याने दिलेला आनंद या गोष्टी खोट्या ठरत नाहीत. आपणही आपले हे छोटेसे जीवन त्या फुलासारखे सुंदर करू शकतो.या नाशवंत जीवनाला त्याच्या अस्तित्व कालापुरता का होईना; पण काही अर्थ प्राप्त करून देऊ शकतो,तसे करण्यातच या जीवनाचे काही सार्थक आहे.या जीवनाचा प्रवास करत असताना आपल्या निकट राहून सोबत करणारी,धीर पुरवणारी, आपल्या पेक्षा चार पावले पुढे चालत राहून प्रेरणा देणारी अशी निरनिराळया कोटीतील माणसे आपल्याला भेटतात. त्यांच्यापैकी काहींच्या सहवासामध्ये निरामय आनंदाचे क्षण लाभतात.आणखी कोणाच्या विचारामधून अंत:करणाला काही दिलासा मिळतो आणि असामान्य विभूतींनी दाखवून दिलेल्या मार्गाच्या अल्पशा अनुसरणातून आपले जीवन उन्नत होते. या साऱ्या व्यक्तींविषयी कृतज्ञतेचा भाव ठेवणे हे जीवनातील एक कर्तव्य ठरते. त्यांचे स्मरण जागवणे हा त्यांच्या ऋणांतून काही प्रमाणात उतराई होण्याचा एक मार्ग आहे. कती: एका शब्दात उत्तर द्या. १. वरील उताऱ्यात वर्णन केलेला घटक २. लेखकाला प्रेरणा देणारे बागेतील घटक, ३. कसा ते सांगा–बागेतील टपोऱ्या फुलाचा लेखकाला आलेला अनुभव स्वमत अभिव्यक्ती हा उतारा वाचल्यावर तुमच्या मनात आलेले विचार लिहा.​

Answer» <html><body><p><strong><a href="https://interviewquestions.tuteehub.com/tag/answer-15557" style="font-weight:bold;" target="_blank" title="Click to know more about ANSWER">ANSWER</a>:</strong></p><p>(१) फुल</p><p><strong>Step-by-step <a href="https://interviewquestions.tuteehub.com/tag/explanation-455162" style="font-weight:bold;" target="_blank" title="Click to know more about EXPLANATION">EXPLANATION</a>:</strong></p><p>(२) बागेत उमटलेले टपोरे फुल</p><p>(३) सौम्यसा सुगंध आल्हाददायक असतो त्याच्या नाजूक पाकळ्या आणि सुरेख रंग डोळ्यांना सुखावतात. हा छोटासा अनुभव घेतानाही आपले मन प्रसन्न होऊन जाते.इवल्याशा फांदीवर वाऱ्याच्या लहरींनी डुलणारे ते फूल</p></body></html>


Discussion

No Comment Found