1.

Marathi story can you please send me ​

Answer»

वर्षापूर्वीची गोष्ट आहे .एकदा एक राजा आपल्या मुलांसाठी राजवाड्याजवळ एक मोठ्ठ तलाव बांधतो आणि त्यात मुलांना खेळण्यासाठी मासे सोडतो.

तलाव तयार झाल्यावर त्याची मुलं तलाव पाहायला जातात. त्या तलावात सगळ्या माशांबरोबर एक बेडूकपण राहत असते. राजाच्या मुलांनी त्याअगोदर बेडूक कधी पाहिलेले नसते त्यामुळे त्यांना वाटते तलावात हा बेढब प्राणी कशाला? ते राजाला जाऊन सांगतात कि तलावात त्यांना न आवडणारा एक बेढब प्राणी आहे.

राजा लगेचच त्याच्या शिपायांना सांगतो कि त्या बेढब प्राण्याला मारून टाका. तेव्हा शिपाई तलावाच्या काठावर उभे राहून आपापसात काय करायचे ते ठरवू लागतात. कोणी सांगतात त्याला जाळून टाका, चिरडून टाका. सर्वांच्या वेगवेगळ्या सूचना येतात. शेवटी पाण्याला घाबरणारा वृध्द शिपाई सांगतो कि 'त्या प्राण्याला दूर वाहत्या पाण्यात फेकून द्या म्हणजे तो वाहत जाऊन खडकावर आपटेल आणि मरेल.'ते ऐकून हुशार बेडूक म्हणाले मला पाण्यात फेकू नका नाहीतर मी मरून जाईन.'

बेडूकाची याचना ऐकून शिपाई त्याला पटकन पाण्यात फेकून देतात. बेडूक जोरजोरात हसू लागते आणि म्हणते 'या मूर्ख लोकांना माहित नाही कि, मी पाण्यात किती सुरक्षित आहे.'

तात्पर्य - शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ट.



Discussion

No Comment Found