1.

पृथ्वी चंद्र वरुण कशी दिसते​

Answer» ONG>ANSWER:

I hope you have got your answer so MARK me brilliansit and follow me ❣️

Explanation:

शंकरराव, मागच्या वेळी चंद्रावर पडणारा पृथ्वीप्रकाश आपण पहिला. पण त्याने चंद्रावरून पृथ्वी कशी दिसते ते काही कळले नाही. आज त्या त्याबद्दल काही सांगा!”, दुर्गाबाई म्हणाल्या.

“दुर्गाबाई, सूर्यमालेतील सर्वात सुंदर आणि चैतन्यपूर्ण ग्रह म्हणजे पृथ्वी! या अप्रतिम ग्रहाचे दर्शन घेण्यासाठी चंद्रापेक्षा योग्य ठिकाण कोणते असू शकते? तर, आज चंद्रावरून पृथ्वीचे दर्शन घेऊ – “, आबा सांगू लागले.

आबा काही सांगत आहेत म्हणता, सुमितने हातातले पुस्तक बाजूला ठेवले आणि आजी-आबांच्या बरोबर टेबलवर येऊन बसला. तसे आबा पण उत्साहाने म्हणाले, “सुमित, कसे आहे, चंद्र आणि पृथ्वी दोघे पडले परप्रकाशी! दोघांवर सूर्याचा प्रकाश पडतो म्हणून ते दिसतात. या दोन्ही ग्रहांच्या ज्या अर्ध्या भागावर सूर्यप्रकाश पडतो तिथे उजेड आणि उरलेल्या अर्ध्या भागावर अंधार असतो. आता, पृथ्वी भोवती प्रदक्षिणा घालतांना, चंद्र त्या कक्षेत कुठे आहे, त्या प्रमाणे त्याला थोडा उजेडाचा आणि थोडा अंधाराचा भाग दिसतो. कधी कधी संपूर्ण प्रकाशातला भाग दिसतो, तर कधी पूर्ण अंधारातला भाग दिसतो, आणि कधी अर्धा उजेडातला आणि अर्धा अंधारातला भाग दिसतो.”, आबा सांगत होते



Discussion

No Comment Found