1.

२)डॉ. रघुनाथ माशलेकर यांच्या यशामध्ये त्यांच्या आईचा मोठा वाटा आहे हे विधान स्पष्ट लिहा

Answer»

भारतीय संशोधक, बौद्धिकसंपदा हक्क व नवनिर्मितीची संस्कृती रुजविण्यासाठी कार्यरत असलेले नेतृत्व…भारतातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी बौद्धिक क्षमतेच्या आधारे ज्ञानाचे अर्...थपूर्ण नियोजन करणारे…विज्ञानाला ग्लॅमर मिळवून देणारे आणि खऱ्या अर्थाने समाजाभिमुख असलेले भारतातील आघाडीचे जगद्विख्यात रसायनशास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर...!!!

केमिकल इंजिनीअरिंगमधील त्यांचे संशोधनकार्य मोठे आहेच, पण त्याहून मोलाचे कार्य म्हणजे त्यांनी भारतातील विज्ञानविश्वाला १९८० च्या दशकापासून दिलेले सक्षम नेतृत्व! भारतासाठी तो काळ होता संशोधनसुविधांच्या अभावाचा होता. संशोधकसुद्धा भारतापेक्षा परदेशातच काम करण्यासाठी उत्सुक असायचे. अशा वेळी ज्या मोजक्या लोकांनी भारताच्या वैज्ञानिक विकासाची धुरा सांभाळली, त्यात डॉ. माशेलकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते.

रघुनाथ माशेलकरांचा जन्म कोकणातल्या माशेल गावाचा तर बालपण मुंबईत गेलं. त्यांच्या आई, हे त्यांचं प्रमुख प्रेरणास्थान! लहानपणीच पित्याचे छत्र हरपल्याने त्यांना त्यांच्या आईने शिवणकाम किंवा मिळेल ते काम करुन, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, जिद्दीने शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. ‘आज माझं शिक्षण नाही म्हणून मला काम मिळालं नाही, पण माझ्या मुलाला मात्र मी जगातलं सर्वोच्च शिक्षण देईन’ हा निर्धार पुरा करण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले. गिरगांव चौपाटीवर सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करून अकरावीच्या परीक्षेत रघुनाथ माशेलकर बोर्डाच्या मेरिटमध्ये आले आणि त्यांनी अनेक शिष्यवृत्तीही मिळविल्या.

मुंबईतल्या पालिकेच्या शाळेतल्या शिक्षकांनी माशेलकरांचं आयुष्य घडवलं. शाळा तशी गरीब परिस्थितील असली तरी शिक्षक मात्र ज्ञानाने श्रीमंत होते. तेथील नरहर भावे सर, एकदा बहिर्गोल भिंगाविषयी शिकवतांना माशेलकरांना म्हणाले ''या भिं



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions