| 1. |
तुमच्या मित्राला मिळालेले बक्षीस त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा |
|
Answer» खन (अभिनंदन) बी - ७०१,अजमेरा एरिया,कोरेगांव पार्क,पुणे-४११००११२ जून २०२०प्रिय शौर्य,कसा आहेस तू? मी इकडे ठीक आहे आणि ईश्वरचरणी तुझ्या खुशालीची कामना करतो.शौर्य, प्रथमतः तुझे मनापासून अभिनंदन!सकाळीच तुझे नाव आणि तुझा फोटो वर्तमानपत्रात पाहिला आणि माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. तू नृत्य स्पर्धेत प्रथम आला ही बातमी कळल्यावर माझा आनंद गगनात मावेनासा झाला.तुझ्या यशासाठी मनःपूर्वक अभिनंदन!मला माहित आहे तु यासाठी किती कष्ट केले आहेत आणि याचे फळ तुला मिळाले. तुझ्या आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग येत राहो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!भविष्यासाठी माझ्या शुभकामना तुझ्या सोबत राहतील.काका-काकूंना नमस्कार सांग. मला माहित आहे तू त्याची काळजी घेत असशीलच.शौर्य, तुझ्या या यशासाठी पुनश्च अभिनंदन करत पत्राचा शेवट करतो.तुझाच मित्रऋत्विज |
|