

InterviewSolution
Saved Bookmarks
1. |
Marathi Grammar samas |
Answer» \tकाटकसर करणे हा मनुष्याच्या अंगी असलेला एकूण गुण आहे. आपण दैनंदिन जीवनात बरीच काटकसर करतो. त्यामुळे आपण बोलतांना सुद्धा हा गुण वापरतो. बर्\u200dयाचदा आपण एखादे वाक्य पूर्ण न बोलता शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करतो. जो त्या वाक्यातील अर्थबोध करून देतो. यालाच\xa0‘समास’\xa0असे म्हणतात. अशी काटकसर करून जो शब्द तयार होतो त्यालाच\xa0सामासिक शब्द\xa0असे म्हणतात.उदा.\tवडापाव\xa0– वडाघालून तयार केलेला पाव.\tपोळपाट\xa0– पोळी करण्यासाठी लागणारे पाट\tकांदेपोहे\xa0– कांदे घालून तयार केलेले पोहे.\tपंचवटी\xa0– पाच वडांचा समूहसमासाचे मुख्य 4 प्रकार पडतात.\t1. अव्ययीभाव समास\t2. तत्पुरुष समास\t3. व्दंव्द समास\t4. बहुव्रीही समास | |